Posted by उदयराज बाळ on April 3, 2006
मैं गाने वाला पंछी
नित नये गीत मैं गाऊँ
कोई सुने या ना सुने
मैं अपना जी बहलाऊँ ||
मैं रमता झुमता जोगी
मै अपनी धुनी रमाऊँ
कोई आये या ना आये
मैं चलता चला जाऊँ ||
मैं उडता फिरता बादल
बुंदे अपनी बरसाऊँ
कोई भीगे या ना भीगे
धरती की प्यास बुझाऊँ ||
Posted in कवीता, हिंदी | Leave a Comment »
Posted by उदयराज बाळ on April 3, 2006
दुनियेचं रंगलेलं गाणं एेकतांना
थोडं गुणगुणायचं होतं
म्हणायचं ते ओठातच विरलं
राहुनच गेलं …
ओंजळ भरुन दोन्ही हातांची
भरभरुन घेतलं
चिमुटभर दयायचं
राहुनचं गेलं …
सहस्त्रधारांनी भिजतांना
गात्र-गात्र चिंब होतांना
नकळत पाझरायचं होतं
थेंब बनून ओघळायचं
राहुनचं गेलं …
बहरायचं होतं, फुलायचं होतं
फुलांचे सडे शिंपायचं होतं
वेचणा-या हातांसाठी झुरायचं
राहुनचं गेलं …
असं साचुन राहायचं नव्हतं
खळाळत वहायचं होतं
कडे-कपारीतुन उसळायचं
राहुनचं गेलं …
असं धुमसत राहायचं नव्हतं
ज्वालामुखी, वणवाही
व्हायचं नव्हतं
दिव्यासारखं तेवायचं
राहुनचं गेलं …
रितं रितं आभाळ माझं
बरसायचं विसरुन गेलं
स्वतःचं आभाळपणच
हरवून बसलं …
Posted in कवीता, मराठी | 2 Comments »
Posted by उदयराज बाळ on April 3, 2006
हवंच का
तुझ्या माझ्या नात्याला नाव?
तू हसावंस ओळखीचं
माझ्या भोळसट स्मिताला …
अन्
तू आपल्या पिंग्या केसातुन
हात फिरवतांना,
त्यांच्यावरुन परतणा-या प्रकाशाकडे
मीही मुग्ध होऊन पाहत राहावं …
अगदीच मनातल्या गुजगोष्टी नकोत
दोन-चार गप्पाच माराव्यात
मला नकोय जन्म-जन्मांतरीचा सहवास
तुझ्या सोबतीचे चार पळही पुरतील …
माझ्यासाठी तू जीव पाखडावास
असं मी म्हणत नाही
मात्र हृदयात माझी एक जागा ठेवशील
अशी खात्री अाहे …
तरीही तुझ्या-माझ्या नात्याला नाव हवं का खरंच?
Posted in कवीता, मराठी | 1 Comment »
Posted by उदयराज बाळ on April 3, 2006
कुणी विचारलच तरीही
चटकन सांगायचं नसतं
मनातल्या चिरेबंदीत
डांबायचंही नसतं
डोळ्यानीच सांगायचं
हव्या त्या डोळ्यांना
हव्या त्या डोळ्यांचं
डोळ्यानीच एेकायचं
सार-यांचं जवळपास
सारखंच असतं
तरीही आपापलं
गुपीत असतं
Posted in कवीता, मराठी | Leave a Comment »