नातं
Posted by उदयराज बाळ on April 3, 2006
हवंच का
तुझ्या माझ्या नात्याला नाव?
तू हसावंस ओळखीचं
माझ्या भोळसट स्मिताला …
अन्
तू आपल्या पिंग्या केसातुन
हात फिरवतांना,
त्यांच्यावरुन परतणा-या प्रकाशाकडे
मीही मुग्ध होऊन पाहत राहावं …
अगदीच मनातल्या गुजगोष्टी नकोत
दोन-चार गप्पाच माराव्यात
मला नकोय जन्म-जन्मांतरीचा सहवास
तुझ्या सोबतीचे चार पळही पुरतील …
माझ्यासाठी तू जीव पाखडावास
असं मी म्हणत नाही
मात्र हृदयात माझी एक जागा ठेवशील
अशी खात्री अाहे …
तरीही तुझ्या-माझ्या नात्याला नाव हवं का खरंच?
Sarika Madhuri Aai Pappa said
Its very very sweet. waiting for “punha naat”