हवं असतं कुणीतरी तुमच्याशी भांडणारं
भांडल्यावर देखील तुमच्या
वाट्यात वाटा मागणारं
हवं असतं कुणीतरी
तुमची वाट पाहणारं
तुम्ही रागावुन गेल्यावर
ओले डोळे टीपणारं
खरंच असावं कुणीतरी…
खरंच असावं कुणीतरी
कडाडुन भांडणारं
सारं भांडुन झाल्यावर
मायेनं बिलगणारं
Archive for July 26th, 2006
हवंहवंसं
Posted by उदयराज बाळ on July 26, 2006
Posted in कवीता, मराठी | 1 Comment »
बाहेर पाहतांना
Posted by उदयराज बाळ on July 26, 2006
बाहेर पाहतांना आत मात्र
सापडतोय स्वत:च स्वत:ला
प्रत्येक वेळी विचार करतो
मी खरंच का माझ्या कोषातून
पडलो असेन बाहेर
झाले असेल माझे
फुलपाखरु सुंदर
दरवेळी स्वत:ला घडतांना पाहण्याचा
मला असा छंद लागतोय
बाहेर पाहतांना आत मात्र
स्वत:च स्वत:ला सापडतोय
आत्ममग्न गुणगुण स्वत:ची
स्वत:च ऐकतांना
माझ्यातल्या माझीच ओळख पटतेय
सारखं बाहेर पाहतांना
आतही काही वाहतेय
कळत नकळत मात्र
स्वत:च स्वत:ला सापडतोय
एवढच फक्त खरं!
Posted in कवीता, मराठी | Leave a Comment »