अलवार
Posted by उदयराज बाळ on February 17, 2007
एक थेंब असा निथळला,
केसातुन गाली ओघळला
तुझ्या केसांच्या आठवणीने
शहारा फुलवून गेला
एक थेंब जरा चुकार
माझ्या कानी शिरला
काही नवे, अनवटसे
कुजबुजून गेला
एक थेंब उगा हिरमुसला
मी अलगद तळ-हाती धरला
तुझ्या भेटीगत आला
नकळत विरुन गेला
एक थेंब असा बरसला
सर्वांग भिजवुनी उरला
अनोळखी, अलवार काही
मनात रुजवूनी गेला
Shailesh S. Khandekar said
कविता सुंदर झालिये.
एक थेंब जरा चुकार
माझ्या कानी शिरला
काही नवे, अनवटसे
कुजबुजून गेला
अप्रतिम!
Dinesh Wadekar said
खरच छान आहे कविता…
Madhuri said
ek themb hasra
algad hati japawa
aayushyat godwa
gheuni yawa…
deepanjali said
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर
amar shingare said
mala pharach aavadali kavita
उदयराज बाळ said
धन्यवाद अमर!
आता फारसं लिहत नाही.
पण तुमच्या ऊत्तेजना मुळे नक्कीच लिहावसं वाटेल.